

आदेश
प्रत्येक १८ वर्षापुढील सर्व युबक आणि युवतींनी समता सैनिक दलाचे सैनिक झाले पाहिजे.
गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या समता सैनिक दलामध्ये मोठ्या संख्येने सैनिक भरती सुरु आहे. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी समाजातील प्रत्येक तरुण वर्ग हा समता सैनिक दलात सामील झाला पाहिजे यासाठी समता सैनिक दलामध्ये सैनिक प्रक्रिया सुरु केली आहे.
२० मार्च २०२७ रोजी समता सैनिक दलाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षी समता सैनिक दलाचे १ लाख सैनिक तयार झाले पाहिजे यासाठी युवक व युवतींना समता सैनिक दलामध्ये सामील होण्यासाठी आवाहन केले जात आहे.
प्रत्येक रविवारी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण प्रत्येक बटालियन मध्ये सुरु आहेत. मुंबई मध्ये चैत्यभूमी या ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण कॅम्प प्रत्येक रविवारी असतो आणि यासाठी मुंबई भागातील तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने सामील होत आहेत. यामुळे समता सैनिक दलाचे कार्य आणि इतिहास नवीन तरुणांना समजू लागला आहे. समता सैनिक दलात का ? सामील झाले पाहिजे याबद्दल अधिक माहिती मिळत आहे. तरुणांना लष्करी प्रशिक्षण मिळत असल्याने फिजिकल ट्रेनिंग असल्याने अनेक तरुणांना आपल्या मधील फिजिकल उणिवांची जाणीव होत आहे . यामुळे त्यांना देखील अधिक जोमाने उत्साहाने समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणात सामीलहोण्याची इच्छा निर्माण होत आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण कॅम्प भरवले जात असून अधिकाधिक सैनिक भरती करण्याचे कार्य केले जात आहे. या महत्वाच्या कामामध्ये समता सैनिक दलाचे असि. स्टाफ ऑफिसर अशोक कदम सर हे समता सैनिक दलाच्या नवीन प्रशिक्षणार्थी यांना समता सैनिक दलाचे प्रशिक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत. समता सैनिक दलाच्या नवीन सैनिकांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.





